लांब आणि सरळ केस असलेल्या महिलांचे विचार स्पष्ट आणि व्यवस्थित असतात. त्या नेहमी काळजीपूर्वक विचार करून बोलतात.
त्यासोबत या महिला हुशारीने पैसे खर्च करतात. त्या नेहमी स्वत: च्या कामात व्यस्त असतात. त्या त्यांचे विचार दुसऱ्यांना शेअर करत नाहीत.
तर ज्या महिलांचे केस पातळ असतात त्या खूप मेहनती असतात. करिअरमध्ये त्यांना त्यांचे नशीब साथ देते. त्यांचे मित्र खूप कमी असतात.
तर पातळ केस असलेल्या महिला शांततेला खूप महत्त्व देतात. या महिलांचा प्रेमाकडे जास्त कल नसतो.
ज्या महिलांचे केस पूर्णपणे कुरळे असतात त्या भविष्याबद्दल जास्त विचार करत नाहीत.
त्या त्यांच्या जीवनातील चढ-उतारांवर सहज मात करू शकतात. या महिलांना संगीत आणि साहित्यामध्ये रस असतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)