मोदींच्या सभेनंतर १७ भाजप उमेदवार विजयी, १३ पराभूत
मुंबई: शिवसेना-भाजप महायुतीच्या ब्रेकअपपूर्वी महाराष्ट्रासाठी केवळ सहाच सभा पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं होतं. पण ‘महायुती’ फुटल्यानंतर त्यांनी राज्यात तब्बल २७ सभा घेत भाजपच्या जवळपास १७० उमेदवारांसाठी आपल्या पंतप्रधानपदाची सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
शिवाय केंद्रातले भाजपचे मंत्री, खासदार, भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्यासह गुजरातमधील नगरसेवकांपर्यंत सगळ्यांनाच मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या मोहिमेवर धाडलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या २७ ठिकाणांपैकी १७ ठिकाणचे भाजप उमेदवार विजयी झाले. तर इतर ठिकाणी १३ भाजप उमेदवारांचा पराभव झालाय.
मराठवाड्यातील तीन सभा ‘फेल’
मोदींच्या सभांनंतरही मराठवाड्यात तीन ठिकाणी भाजपचा पराभव झालाय. भाजपच्या चिन्हावर लढलेले शिवसंग्राम संघटेनेचे संस्थापक विनायक मेटे यांचा राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी ६ हजारांवर मतांनी पराभव केला. तुळजापूरमध्येही तेच घडलं. मोदींची सभा होऊनही भाजपचे संजय निंबाळकर यांचा काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाणांनी दारूण पराभव केला. तर लोहामध्ये शिवसेनेच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी भाजपचे उमेदवार मुक्तेश्वर धोंगडे यांना थोड्या-थोडक्या नाही तर तब्बल ४० हजारांहून अधिक मतांनी धूळ चारलीय. लोहामध्येही मोदींची सभा झाली होती.
मोदींच्या सभेनंतरचे विजयी उमेदवार
१. संभाजीनगर - अतुल सावे
२. नागपूर - देवेंद्र फडणवीस
३. नाशिक - सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप
४. बोरिवली - विनोद तावडे
५. ठाणे - संजय केळकर
६. नंदुरबार - डॉ. विजयकुमार गावित
७. घाटकोपर - राम कदम, प्रकाश मेहता
८. ब्रह्मपुरी-चंद्रपूर - नानाजी शामकुळे
९. खामगाव - आकाश फुंडकर
१०. कोल्हापूर - अमल महाडिक
११. पिंपरी-चिंचवड - लक्ष्मण जगताप
१२. भुसावळ - संजय सावकारे
१३. सिंदखेडा-धुळे - जयकुमार रावल
१४. हिंगोली- तानाजी मुटकुळे
१५. राहुरी - शिवाजी कर्डिले
१६. धुळे - अनिल गोटो
मोदींच्या सभेनंतरही पराभूत
१. बीड - विनायक मेटे
२. संभाजीनगर - किशनचंद तनवाणीस मधुकर सावंत
३. महालक्ष्मी (वरळी) - सुनील राणे
४. धामणगाव रेल्वे - अरूणभाऊ अडसड
५. तिवसा - निवेदिता चौधरी
६. रत्नागिरी - सुरेंद्र माने
७. पंढरपूर - प्रशांत परिचारक
८. तुळजापूर - संजय निंबाळकर
९. कणकवली - प्रमोद जठार
१०. पालघर - प्रेमचंद मौंड
११. तासगाव - अजित घोरपडे
१२. बारामती - बाळासाहेब गावडे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
मोदींच्या सभेनंतर १७ भाजप उमेदवार विजयी, १३ पराभूत
