राज्यात या दोन जिल्ह्यांत नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण सापडले

रत्नागिरी : राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta Plus variant ) धोका वाढत आहे. राज्यात याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दोन नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आलेत. दोन्ही रूग्ण हे संगमेश्वर तालुक्यातील असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काळजी करण्याचे कारण नाही. जवळपास महिनाभरापूर्वी या दोन रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट सोमवारी आला.  (Patients of the new Delta Plus variant were found in Ratnagiri and Jalgaon districts)

दरम्यान, राज्यात आणखी एका जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी नाशिकमध्येही रुग्ण आढळले होते. आता जळगाव जिल्हयात डेल्टा प्लसचे रूग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण आहे. डेल्टाचे रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांचे रक्ताचे नमुने संकलित करून ते NIV कडे तपासणीसाठी त्यात  डेल्टा प्लसचे सात रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली. तर,डेल्टा प्लसचे रूग्ण बरे होत असल्याचं आरोग्य विभागाने सांगितले. 

राज्यात 12 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे 45 रुग्ण आढळून आले असले तरी घाबरुन जाण्याची परिस्थिती नाही. राज्यात प्रत्येक 100 रुग्णांमागे 80 रुग्णांमागे 80 रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळत आहेत. तर प्रत्येक 100 रुग्णांमागे 0.5 रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे विषाणू आढळून आलेत. 8 हजार तपासण्यांमधून हा निष्कर्ष समोर आलाय. यासाठी सध्या तरी मास्क आणि सुरक्षित अंतर याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

दरम्यान, झायडसच्या कोरोना लसीला आठवडाभरात आपत्कालीन वापराची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. या लसीला परवानगी मिळाल्यास देशातील ही सहावी कोरोना लस ठरणार आहे.

दुसऱ्या लाटेत राज्यात डेथ रेट वाढलेला दिसून येत आहे. पण सोमवारी सर्वात कमी मृत्यूची नोंद राज्यात झाली आहे. त्यामुळे राज्याला मोठाच दिलासा मिळाला आहे. अकोला औरंगाबात मंडळात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर नागपुरात एकाचा मृत्यू झाला. तर पुण्यात मात्र सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात 4हजार रुग्ण आढळलेयत. तर अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 68हजारांच्या आसपास आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Patients of new Delta Plus variant found in Ratnagiri and Jalgaon districts in Maharashtra
News Source: 
Home Title: 

राज्यात या दोन जिल्ह्यांत नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण सापडले

राज्यात या दोन जिल्ह्यांत नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण सापडले
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
राज्यात या दोन जिल्ह्यांत नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण सापडले
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, August 10, 2021 - 10:42
Request Count: 
1
Is Breaking News: 
No