मोठा निर्णय; राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती सुरू करण्याचे आदेश; पण अट एकच...

Maharashtra Shikshak Bharti 2024 : राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती सुरू होणारेय. शिक्षण आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिल्याचं स्पष्ट केलंय. मात्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रक्रिया राबवताना घ्यावी लागणारेय. 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येणारेय. दरम्यान समांतर आरक्षणातील भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे. 

शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी

शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करण्यात येते. पदवीधर / शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल.

दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे.
त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे.

समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Maharashtra Shikshak Bharti 2024 Big decision Order to start teacher recruitment which has been stalled for many days in the state
Home Title: 

मोठा निर्णय; राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती सुरू करण्याचे आदेश; पण अट एकच...

मोठा निर्णय; राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती सुरू करण्याचे आदेश; पण अट एकच...
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
वनिता कांबळे
Mobile Title: 
मोठा निर्णय; राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती सुरू करण्याचे आदेश
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, June 12, 2024 - 19:24
Created By: 
Vanita Kamble
Updated By: 
Vanita Kamble
Published By: 
Vanita Kamble
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
227