मुंबईच्या वातावरणात बदलला मलायकाचा मूड, अर्जुनसोबत व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली...
मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील कायमच चर्चेत असलेली जोडी आहे. मलायका एका मुलाची आई आहे. मलायकाने अरबाजकडून घटस्फोट घेतला आहे. असं असलं तरीही आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुनला मलायका डेट करतेय. मलायका आणि अर्जुनने सगळ्या सीमा पारकडून एकमेकांचं प्रेम जगासमोर ठाम मांडलं आहे. मलायका आणि अर्जुनने जगासमोर येऊन आपलं नातं स्वीकारलं आहे.
दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या आठवड्यात सुट्टीवर गेले आणि सध्या दोघेही पॅरिसमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसले. पॅरिसमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ मलायकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आता दोघेही भारतात परतले आहेत. तरी सुद्धा मलायकाला पॅरिसचे दिवस आठवत आहेत. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करत मलायकाना अर्जुनसोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
व्हिडीओ पोस्ट करत मलायकाने कॅप्शनमध्ये 'मुंबईचं वातावरण सध्या रोमांटिक आहे.' शिवाय मलायकाने अभिनेता अर्जुन कपूरला टॅग देखील केल आहे. मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबईच्या वातावरणात बदलला मलायकाचा मूड, अर्जुनसोबत व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली...
