जगातील या सर्वात महागड्या गायीची किंमत 35 कोटी इतकी आहे. जाणून घ्या भारत कनेक्शन आणि इतकं किंमत असण्यामागील कारण...
ब्राझीलमधील साडेचार वर्षांची एक गाय ही जगातील सर्वात महागडी गाय आहे. या गायीची किंमत तब्बल 35 कोटी रुपये इतकी आहे.
वियाटिना-19 एफआयव्ही मारा इमोविस नावाची ही गाई जगातील सर्वात महागडी गाय आहे.
नुकताच या गायीचा मालकी हक्कांचा एक तितृयांश हिस्सा लिलावामध्ये 6.99 मिलियन रियल म्हणजेच 11 कोटींना विकण्यात आला.
या लिलावानंतर या गायीची एकूण किंमत 4.3 मिलियन डॉलर्स म्हणजेच 35 कोटी रुपये इतकी झाली आहे.
नेलोर प्रजातीच्या या वियाटिना-19 एफआयव्ही मारा इमोविस गायीचं भारताशीही एक खास कनेक्शन आहे.
या गायीच्या प्रजातीचं नाव भारतामधील एका जिल्ह्याच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. हे नाव आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यावरुन ठेवण्यात आलं आहे.
या गायीची भारतामधून ब्राझीलमध्ये निर्यात करण्यात आली. त्यानंतर जगभरामध्ये या प्रजातीच्या गाईंची निर्यात केली गेली.
नेलोर प्रजातीच्या गायींचं सर्वात मोठं वैशिष्ट्यं म्हणजे ही गाय उष्ण प्रदेशामध्येही सहज राहू शकते.
नेलोर गायी उष्णतेमध्ये सहज तग धरु शकण्यामागील कारण म्हणजे या गायींचा रंग पांढरा असतो. त्यामुळे त्यांना उष्णतेचा फार त्रास होत नाही.
रोगप्रतिकारशक्तींच्या बाबतीतही नेलोर प्रजातीच्या गायी या इतर प्रजातींपेक्षा अधिक सरस असतात. त्यामुळे त्यांच्या आजारपणावर अधिक खर्च होत नाही.
नेलोर प्रजातीच्या गायींची त्वचा ही इतर कोणत्याही गायींच्या तुलनेत अधिक जाड असते. त्यामुळे गोचीड किंवा अन्य रक्तपिपासू किटकांचा त्रासही या गायींना होत नाही.