दुसऱ्याचं नाव ऐकून व्हाल हैराण!
पाकिस्तानचा माजी महान गोलंदाज वसीम अक्रम याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक बोल्ड करण्याचा विक्रम नावावर आहे.
वसीम अक्रम याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 278 बोल्ड विकेट घेतले आहेत. तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानचा स्टार माजी गोलंदाज वकार युनुस सर्वाधिक बोल्ड घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वकार युनुसने पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना 253 बोल्ड विकेट काढले आहेत.
इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसन हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक बोल्ड विकेट घेणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
अँडरसनने 196 बोल्ड विकेट घेत इंग्लंडला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
ऑस्ट्रेलियाची स्पीडगन म्हणून ओळखल्या जाणारा मिचेल स्टार्क या यादीत चौथ्या स्थानी आहे.
मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजी करताना 193 बोल्ड विकेट काढले आहेत.
आपल्या अनोख्या स्टाईलने ओळखल्या जाणाऱ्या लसिथ मलिंगा या यादीत पाचव्या स्थानी आहे. श्रीलंकेकडून खेळताना मलिंगाने 171 वेळा दांड्या उडवल्या आहेत.