यामागे DNA अर्थात जेनेटिक कारणंही आहेत. अमेरिकेतीलएका संशोधनातून समोर आलेल्या निरीक्षणानुसार जर आई- वडील Righty आहेत तर, त्यांची मुलं लेफ्टी असण्याची शक्यता 9 टक्के असते.
आई righty आणि वडील लेफ्टी किंवा याउलट परिस्थिती असल्यास ही शक्यता 10 नं वाढून 19 टक्के होते. आई- वडील लेफ्टी असल्यास मुल लेफ्टी होण्याची शक्यता 26 टक्के असते.
जगभरात उजव्या हातानं काम करणाऱ्यांच्या तुलनेत डाव्या हातानं काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे.
इथं एक शास्त्रीय कारण कायम लक्षात ठेवा की मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या बाजूला आणि अवयवांना नियंत्रित करतो, तर उजवा भाग शरीराच्या डाव्या बाजूला नियंत्रित करतो.
बहुतांश व्यक्तींमध्ये ही कला अवगत असते ज्यामुळं उजव्या हातानं लिहितात. मग, आता तुम्हीच ठरवा सर्वात हुशार कोण... (छाया सौजन्य- फ्रीपिक)