3 नोव्हेंबरच्या रात्री भारताची राजधानी दिल्ली येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
या भूकंपाचा केंद्रबिंदू मात्र नेपाळमध्ये होता.
भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी भयानक होती.
पण तुम्ही कधी विचार केलाय का, की नेपाळमध्ये वरचेवर भूकंप का येतात?
नेपाळच्या भौगोलिक रचनेमुळे तेथे भूकंप येतो.
आपली पृथ्वी ही मोठमोठ्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या स्तरापासून बनलेली आहे.
नेपाळ हा इंडो-ऑस्ट्रेलियन आणि यूरेशियन प्लेट्सच्या मध्यभागी वसलेला आहे.
जेव्हा भूगर्भात या दोन प्लेट्सची टक्कर होते तेव्हा भूकंपाचे झटके जाणवतात.
बऱ्याच वर्षांपूर्वी या प्लेट्सच्या टक्कर होण्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली होती.