बॅटरी नेहमीपेक्षा अधिक वेगाने कमी होणे :

तुम्ही तुमचा फोन वारंवार चार्ज करत असल्यास किंवा बॅटरी नेहमीपेक्षा अधिक वेगाने कमी होत असेल तर ते अ‍ॅप्स किंवा फसव्या कोडचे तुमच्या डिव्हाइसची बॅटरी कमी करण्याचे लक्षण असू शकते.

Nov 04,2023

फोन जास्त प्रमाणात तापत असेल तर :

गेमिंग किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग सारख्या फोन गरम होत असेल किंवा तुमचा फोन न वापरताच गरम झाल्यास हे तुमच्या डिव्हाइसवर अनधिकृत नियंत्रण दर्शवू शकते.

लिंक केलेल्या अकाउंटवर...

तुमच्या Facebook आणि Instagram सारख्या कनेक्ट केलेल्या अकाउंटवरलक्ष ठेवा. अनपेक्षित पोस्ट्स किंवा ईमेल आल्यास लगेच त्याची पडताळणी करा

स्लो परफॉर्मन्स :

तुमचा फोने जर आधी सारखा चालत नसेल किंवा फोन अचानक स्लो होत असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्याचे शोध घ्या

अ‍ॅप्स क्रॅश होणे :

अ‍ॅप्स क्रॅश होणे, लोड करण्यात फेल होणे, फोने अचानक रीबूट होणे किंवा वापर करत नसताना इनपुटशिवाय स्क्रीन उजळणे ही सर्व हॅकिंग प्रक्रियेची चिन्हे असू शकतात.

पुश नोटिफिकेशन्स :

तुम्हाला संशयास्पद पुश नोटिफिकेशन्स मिळणे जसे की बनावट व्हायरस अलर्ट किंवा धमकी देणारे संदेश, त्यावर टॅप करणे टाळा, कारण ते हॅकरच्या जोडलेले असू शकतात.

तुमची अ‍ॅप लिस्ट :

तुमच्या फोनवर इंस्टॉल केलेल्या अ‍ॅप्सवर लक्ष ठेवा आणि कोणतीही अपरिचित अ‍ॅप्स अनइंस्टॉल करा, कारण ते स्पायवेअर ही असू शकतात. नेहमी अधिकृत अ‍ॅप स्टोअरमधून अ‍ॅप्स डाउनलोड करा आणि इंस्टॉलेशनपूर्वी डेव्हलपरची माहिती वाचून घ्या.

मोबाइल डेटा :

मोबाइल डेटाच्या वापरामध्ये अचानक झालेली वाढ हे सूचित करू शकते की फोने हॅक झाला असेल आणि अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर तुमचा डेटा चोरून वापरत आहेत.

अपरिचित फोटो :

तुमच्या गॅलरीत अपरिचित फोटो किंवा व्हिडिओ भेटणे किंवा तुमच्या फोनचा फ्लेश अचानक चालू होणे, हे तुमच्या कॅमेऱ्यावरील रिमोट कंट्रोलचे सूचक असू शकते म्हणून या कडे लक्ष द्या

कॉल लॉग तपासा :

वेगळे साइन असलेले मेसेज किंवा तुम्ही न केलेले कॉल असतील तर सतर्क राहा, कारण हे तुमच्या फोनशी तडजोड झाली असल्याचे सुचवू शकतात

VIEW ALL

Read Next Story