वेगवेगळ्या देशांमध्ये विविध प्रकारचे कायदे आहेत. त्या कायद्यानुसारच लोकांना काम करावे लागते.
विविध देशांमध्ये लग्नासाठी वेगवेगळे कायदे आहेत. परंतु, इराणमध्ये एक विचित्र कायदा बनवण्यात आला आहे.
इराणच्या या कायद्याबद्दल ऐकून जगभरातील प्रत्येकजण आश्चर्यचकित आहेत. यामध्ये वडील आपल्या दत्तक मुलीशी लग्न करू शकतात.
हा कायदा तेथील सरकारनेच बनवला आहे. 2013 मध्ये तत्कालीन इराण सरकारने हा कायदा केला होता.
इतर कोणत्याही देशात असा कायदा नाहीये. इराणमधील 9 ते 13 वर्षांच्या मुली लग्न करू शकतात. तर मुलं 15 वर्षांनंतर लग्न करू शकतात.
दत्तक मुलीशी लग्न करू इच्छिणाऱ्या वडिलांसाठी एक नियम आहे. ज्यामध्ये किमान त्या मुलीचे वय 13 असावे.