मध आणि लवंगाचा उपयोग कित्येक आयुर्वेदीक औषध तयार करण्यासाठी केला जातो.
मध आणि लवंग खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
या दोघांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स हे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात आढळतात.
मध आणि लवंग एकत्र खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत.
सर्दी खोकल्यावर घरगुती उपचार म्हणून मध खाल्ले जाते.
पण मधासोबत लवंग खाल्याने सर्दी खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.
मांसपेशीमध्ये वेदना होत असतील, तेव्हादेखील लवंगासोबत मधाचे सेवन करू शकता.
पचनासंबंधी आजार असल्यास मधासोबत लवंग खाणे फायदेशीर ठरते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)