आजकाल लोक वेगवेगळ्या तसेच स्टाइलिश फॅशन ब्रँडचे कपडे घालणं पसंत करतात.
अधिकतर ब्रँडेड कपडे साधारण कपड्यांपेक्षा महागच असतात.
मात्र, या वेगवेगळ्या बँड्सच्या कापडांमध्ये जगातील सर्वात महाग कापड नेमकं कुठे बनतं? जाणून घेऊयात.
खरंतर, विकुना नावाचे फॅब्रिक हे जगातील सर्वात महाग फ्रॅब्रिक असल्याचं सांगितलं जातं.
या खास फॅब्रिकपासून बनलेल्या फक्त एका मोज्याची किंमत ही 80,000 रुपयांपासून सुरू होते.
हे विकुना फॅब्रिक अमेरिकेतील एंडीज पर्वतांमध्ये मिळतं.
हे फॅब्रिक एका विशेष प्रजातीच्या उंटाच्या लोकरापासून बनवले जाते.
खरंतर, हे विशेष प्रजातीच्या उंट हे विलुप्त होत असल्याकारणाने विकुना फॅब्रिक हे खूप महाग कापड आहे.