आपल्यापैकी अनेकांना वारंवार भूक लागते. मात्र, यामागचं नेमकं कारण बऱ्याचजणांना माहित नसेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
आहारातील पोषक तत्त्वांची कमतरता ही वारंवार भूक लागण्याला कारणाभूत ठरु शकते. ही समस्या दूर करण्यासाठी आहारात मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वं असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
कामामुळे किंवा वैयक्तिक बाबींमुळे बऱ्याचदा ताण जाणवू लागतो आणि शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते. यामुळेच वारंवार भूक लागते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अनेकांना एकटेपणा भासत असताना जास्त भूक लागते. अशातच, भावूक झाल्यावर ते खूप जास्त खातात.
घरी फावल्या वेळेत अनेकांना काही चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि यादरम्यान ते अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त अनहेल्दी पदार्थ खातात.
मद्यपान करणे हे भूक वाढण्याला कारणीभूत ठरते. कारण मद्यपान करताना अनेकजण नमकीन किंवा फॅटी स्नॅक्स खाणं पसंत करतात, ज्यामुळे वारंवार भूक लागते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)