जगातील सर्वच पक्षी हे सरळ म्हणजेच पुढच्या दिशेत उडतात. मात्र, असा एकमेव पक्षी आहे जो नेहमी उलट्या दिशेत उडतो.
हा पक्षी 1 सेकंदात जास्त वेगाने 80 वेळा आपले पंख फडफडवू शकतो.
5 ते 6 सेंटीमीटर लांबी असलेला हा पक्षी जगातील सर्वात लहान पक्षी आहे.
या पक्ष्यांचे वजनदेखील खूपच कमी म्हणजेच 2 ते 5 ग्राम इतके असते.
या अनोख्या पक्ष्याचे नाव आहे हमिंगबर्ड.
या पक्ष्याचे चकित करणारे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी उलट्या दिशेत उडू शकतो. हमिंगबर्ड शिवाय दुसरा कोणताच पक्षी विरुद्ध दिशेत उडू शकत नाही.
क्यूबामध्ये राहणारे मधमाशी हमिंगबर्ड ही या पक्ष्याची आणखी एक प्रजाती आहे. हमिंगबर्डने दिलेली अंडी सुद्धा सर्वात लहान असल्याचे सांगितले जाते.
जगातील पक्ष्यांच्या 10 हजारांहून अधिक प्रजातींमध्ये मधमाशी हमिंगबर्ड ही सगळ्यात लहान प्रजाती आहे.