'या' पांढऱ्या पक्षाचं स्वप्नात दिसणं शुभं, घरातील दारिद्रय होईल दूर

Pooja Pawar
Feb 05,2025


प्रत्येक व्यक्तीला रात्री झोपल्यावर वेगवेगळी स्वप्न पडतात. ज्याचा अर्थ एक सारखा नसतो.


स्वप्न शास्त्रानुसार कोणतीही व्यक्ती अकारण स्वप्न पाहत नाही. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी या दिसणाऱ्या घटनांकडे इशारे करत असतात.


स्वप्नात काही पक्षी दिसणं शुभ मानलं जातं. यापैकी एक पक्षी म्हणजे 'पांढरा हंस'.


स्वप्न शास्त्रनुसार जर तुम्ही स्वप्नात हंस पक्षी किंवा त्याच्या जोडीला पोहोताना पाहत असाल तर हे खूप शुभ संकेत देतात. असं मानलं जातं की तुमच्या आयुष्यात खूप चांगला काळ येणार आहे.


स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नात कोणती व्यक्ती हंस पक्षाला दाणे टाकताना दिसत असेल तर हा शुभ संकेत असून याचा अर्थ असा की तुमचे एखादे थांबलेले काम पूर्ण होईल.


स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नात पांढरा हंस दिसला तर ते घरात काहीतरी शुभ कार्य होणार असल्याचे संकेत असते. घरात लग्न, गृहप्रवेश इत्यादी शुभकार्य घडू शकतात.


स्वप्नात पांढरा हंस दिसणे सुख आणि समृद्धीचे प्रतीक असते. स्वप्नशास्त्रात सांगितल्यानुसार घरातील दारिद्रय दूर होऊन अचानक धनलाभ होऊ शकतो.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story