तहानलेला सिंह नदी काठी तहान भागविण्यासाठी जातो. तिथे पोहोचताच क्षणी त्याचा सामना मगरीशी होतो.
मगर अशी तठस्थ उभी राहते जणू काही ती सिंहाला म्हणतेय हा तर माझा इलाका आहे.
सिंहाला नदीकडे येताना पाहून मगर आक्रमक भूमिकेत येते. मगरीचं हे रुप पाहून सिंहही घाबरतो.
हो, या मगरीचं रौद्ररुप पाहून सिंह दोन पाऊस मागे सरकतो. या व्हिडीओमध्ये सिंहाचं रुप पाहण्यासारखं आहे.
मगरीने सिंहाला काही झालं तरी नदीजवळ फिरकू दिलं नाही. सिंहाने कधी विचारही केला नव्हता की त्याला मगरीसमोर माघार घ्यावी लागेल ते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नेटकऱ्यांकडून हा व्हिडीओ वारंवार पाहिला जातो आहे.
जंगलाच्या सिंहाला देखील मगरसमोर माघार घ्यावी लागली आणि तो उलट्या पावली निघून गेला.