या चिमुकल्यांना ओळखलं का?

वरच्या फोटोतील चेहरे थोडेफार ओळखीचे वाटत आहेत ना? हे फोटो कोणाचे आहेत पाहूयात...

Swapnil Ghangale
Jun 16,2023

अ‍ॅमेझॉनचे मालक

अ‍ॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटचे मालक जेफ बेझोस यांच्या बालपणीचा हा लूक शेअर केला आहे इन्स्ताग्रामवरील 'वाईल्ड ट्रान्स' या पेजने.

जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार

तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल तर हा चेहरा ओळखला असेलच. बरोबर हे आहेत जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या बालपणीचा AI जनरेटेड लूक.

अनेक वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेला चेहरा

तसं तुम्ही ओळखलं असेलच तरी सांगायचं झालं तर हा फोटो मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या बालपणीचा लूक दर्शवतो.

चीनमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व

काही काळापूर्वी अचानक चर्चेत आलेल्या व्यक्तीचा हा लहानपणीचा लूक. कोणी ही व्यक्ती ओळखलं का? चीनमधील प्रसिद्ध उद्योगपती जॅक मा यांचा हा चाइल्डहूड लूक आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच एलॉन मस्क हे लहानपणी असेच दिसत असतील.

हा चेहरा ओळखला का?

तुम्ही नक्कीच हा चेहरा ओळखला असणार. बरोबर हा आहे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचा लहानपणीचा AI जनरेटेड लूक

भारतीयांचं आवडतं व्यक्तीमत्व

टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा लहानपणी असेच दिसत असतील.

जगातील सर्वात मोठ्या कंपनीचा CEO

हा मुलगा कोण ओळखलं का? गुगलचे CEO सुंदर पिचाई यांचा हा चाइल्डहूड लूक कसा वाटला? मूळचे भारतीय असलेले पिचाई खरोखरच लहानपणी एवढे क्यूट दिसत असतील ना.

सर्वात मोठ्या आयटी कंपनीचे मालक

देशातील सध्याच्या आघाडीच्या कंपनीचे संस्थापक लहानपणी असेच दिसत होते. हा फोटो नारायण मुर्तींचं बालपण दर्शवतो.

भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती

हा चिमुकला सध्या भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटले. पण एआयवरुन बनवण्यात आलेली ही इमेज मुकेश अंबानी लहानपणी कसे दिसत असतील हे दर्शवते. (सर्व फोटो - 'वाईल्ड ट्रान्स' या इन्स्ताग्राम पेजवरुन साभार)

VIEW ALL

Read Next Story