एका दिव्याने दुसरा दिवा का लावत नाही?
हिंदू धर्मात दिव्याला फार महत्त्व आहे. दीप प्रज्वलित करुन देवी देवतांना आवाहन केलं जातं.
दिवा केवळ अंधार दूर करत नाही, तर देवी देवतांचा शक्ती तुमच्या घरात वास करते.
हिंदू धर्मानुसार सकाळ आणि संध्याकाळी दिवा लावला जातो. दिव्या लावण्याचे अनेक नियमही सांगण्यात आलंय.
शास्त्रात सांगितलंय की, एका दिव्यातून दुसरा दिवा लावू नयेत. काय आहे यामागील कारण?
दिव्याच्या जळत्या ज्योतीमध्ये अग्निदेवतेचा वास असतो. त्यामुळे दिवा अत्यंत पवित्र मानला जातो.
असं म्हणतात की, एका दिव्यात दुसरा दिवा लावला तर त्या दिव्याच्या ज्योतीत जमा झालेली नकारात्मकता दुसऱ्या दिव्याच्या ज्योतीतही प्रवेश करतो. त्याचा नाश होत नाही.
एक दिवा दुसऱ्या दिवा लावला तर नात्यात दुरावा निर्माण होतो.
आर्थिक संकट घरावर येऊ शकतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)