कस्टम विभागाच्या (सीमाशुल्क/ निर्यातशुल्क विभाग) परवानगीशिवाय विमानतळाच्या आत किंवा विमानतळाबाहेर एकही वस्तू येऊ दिली जात नाही. कस्टम विभागात सामानाची स्कॅनिंग केली जाते.
सुरक्षा तपासणीमध्ये एखादी आक्षेपार्ह वस्तू पकडली जाताच ते सर्व सामान पुढील तपासणीसाठी पाठवलं जातं.
सुरक्षा तपासणीतून पुढे न जाणाऱ्या काही वस्तू विमानतळावरील वेअरहाऊसमध्ये ठेवल्या जातात.
विमानतळावरील हे सामान सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये नेलं जातं. तिथं तीन महिन्यांपर्यंत हे सामान ठेवलं जातं.
दरम्यानच्या काळात कोणीही या सामानावर हक्क न सांगितल्यास ते कस्टम डिस्पोजल सेक्शनमध्ये पाठवलं जातं. ज्यानंतर एक समिती स्थापन केली जाते जी या सामानाचा लिलाव करते.
लिलावादरम्यान प्रत्येक वस्तूची नोंद केली जाते. ज्यानंतर या वस्तूचं मूल्यांकन आणि त्यानंतर अंतिम लिलाव केला जातो. (सर्व छायाचित्र सौजन्य- फ्रीपिक)