सध्या लग्नसराईचा माहोल सुरु असून जोडपी विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून लग्न बंधनात अडकत आहेत.
हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न करताना अनेक प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे लग्नादरम्यान वधू वराला मुंडावळ्या बांधणे.
मराठी लग्नांमध्ये वधू वराच्या डोक्याला मुंडावळ्या आणि बाशिंग बांधले जातात. पूर्वीच्या काळी फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या जात असे.
मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधल्यावर नवरा नवरी देखणे दिसतात. त्यांच्या सुंदरतेचा आणखी भर पडते.
मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधल्यावर सर्वांची नजर ही आधी नवरा नवरीने बांधलेल्या मुंडावळ्यांकडे जाते ज्यामुळे त्यांना नजर लागत नाही असे म्हणतात.
शास्त्रीय कारण म्हणजे, लग्नादरम्यान वधू वरांवर खूप ताण असतो. ते सुख आणि दुःख अशा दोन्ही भावनांमधून एका वेळीच जात असतात. डोक्यावर मुंडावळ्या बांधल्यामुळे डोकं शांत ठेवण्यास मदत मिळते.
तसेच लग्नसमारंभातील कार्यक्रमांमुळे जागरण झालेलं असत आणि अशावेळी मुंडावळ्या डोक्यावर विशिष्ठ ठिकाणी बांधल्यामुळे डोकं दुखणं थांबत आणि आराम मिळतो.
सध्या मोत्यांच्या मुंडावळ्या बांधल्या जातात मात्र पूर्वी फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या जायच्या ज्यामुळे फुलांच्या सुगंधामुळे मन प्रसन्न होतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)