चेक रिपब्लिकची प्रमुख कार निर्माता कंपनी स्कोडाने पहिल्यांदाच सब-फोर मीटर कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये पाऊल ठेवत Skoda Kylaq लाँच केली आहे.
Skoda Kylaq ची सुरुवातीची किंमत 7.89 लाख (एक्स शोरुम) ठरवण्यात आली आहे. स्कोडाच्या या स्वस्त कारने मार्केटमध्ये येताच धुमाकूळ घातला आहे.
ऑटोकारच्या रिपोर्टनुसार, Skoda Kylaq चा वेटिंग पीरियड 4 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. पण ते व्हेरियंट आणि रंगावरही निर्भर आहे.
Skoda Kylaq ची डिलिव्हरी सुरु झाली आहे आणि पहिल्या टप्प्यात मे महिन्यापर्यंत 30 हजार युनिट्स डिलिव्हर करण्याची योजना आहे.
काही दिवसांपूर्वी स्कोडाने बेस मॉडल क्लॉसिक ट्रिमची बुकिंग बंद केली होती. आता पुन्हा तिचं बुकिंग सुरु केलं आहे.
Skoda Kylaq चा बेस व्हेरियंट फक्त मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि लिमिटेड कलर ऑप्शनमध्ये आहे. सर्वात जास्त वेटिंग पीरियड याच व्हेरियंटचा आहे.
तर सेकंड बेस मॉडल म्हणजेच सिग्नेचर ट्रिमचा वेटिंग पीरियड 3 ते 4 महिन्यांचा आहे. हे व्हेरियंट ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध आहे.
याशिवाय टॉप स्पेक्समध्ये येणारे दोन ट्रिम्स (सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टिज) साठी ग्राहकांना 2 ते 3 महिने वाट पाहावी लागू शकते.
Skoda Kylaq मूळत: (MQB AO-IN) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये एसयुव्हीला 5-स्टार रेटिंग मिळालं आहे.
यामध्ये 1.0 लीटर क्षमतेचं TSI टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 115 PS ची पॉवर आणि 178 Nm चा टॉर्क जनरेट करते.
यामध्ये 6-स्पीड मॅन्यूअल आणि टॉर्क कन्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने जोडण्यात आलं आहे. ही एसयुव्ही जवळपास 19 किमी/लीटर मायलेज देते.
याच्या बेस क्लॉसिक व्हेरियंटची किंमत 7.89 लाख, सिग्नेचरची किंमत 9.59 लाख, सिग्नेचल प्लसची किंमत 11.40 लाख आणि टॉप मॉडेल प्रेस्टिज AT ची किंमत 14.40 लाख रुपये आहे.