जाणून आश्चर्य वाटेल, पण प्रत्येक दशकातील बाईक प्रेमींना रॉयल एनफिल्डनं भुरळ घातली आहे.
साधारण तीन ते चार दशकांपूर्वी या बाईकची किंमत काय होती माहितीये? जाणून तुम्हीही हैराण व्हाल.
काळानुरूप एनफिल्डच्या बाईकचं डिझाईन बदललं पण, बाईकचं इंजिन आणि परफॉर्मन्स कमाल तो कमालच राहिला.
जी बुलेट आजच्या दिवसाला 1 लाख 50 हजारांच्या बेस प्राईजला येते तिच दुचाकी 38 वर्षांपूर्वी म्हणजेच 1986 मध्ये 18700 रुपयांना विकली जात होती.
सोशल मीडियावर झारखंडच्या दुकानातील एका बिलाचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एनफिल्डची किंमत लक्षात येते.
रॉयल एनफिल्ड बुलेटच्या टॉप मॉडेलची किंमत त्या काळात इतकी कमी असली तरी आज ही किंमत 2 लाख ते 2.50 लाख इतकी आहे.