आजच्या जमान्यात मेसेजिंग आणि चॅटींगसाठी व्हॉट्सअॅपचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. काँलिंगसाठीदेखील व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
पण व्हॉट्सअॅप काँल रेकाँर्ड होऊ शकतो की नाही? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
व्हाँट्सअँपमध्ये इनबिल्ड नाही. पण थर्ड पार्टी अॅप किंवा इतर डिव्हाइसचा उपयोग करुन तुम्ही व्हॉट्सअॅप काँल रेकाँर्ड करु शकता.
गुगल प्ले स्टोअरवर Cube ACR किंवा Salestrail सारख्या काँल रेकाँर्डिंग अॅपचा वापर करुन व्हॉट्सअॅप काँल रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
अॅप इंस्टाँल करा आणि यानंतर मायक्रोफोन आणि स्टोरेजची परवानगी द्या.
आता व्हॉट्सअॅप काँल आपोआप रेकॉर्ड होण्यासाठी कॉन्फिगर होईल.
तुमच्या आयफोनच्या स्क्रिन रेकाँर्डिंग सुविधेचा उपयोग करा. सेटिंगमध्ये जाऊन कंट्रोल सेंटर निवडा.
विंडो पीसीचा उपयोग करत असाल तर व्हॉट्सअॅप काँल रेकॉर्ड करण्यासाठी Xbox गेम बारचा उपयोग करु शकता.