टीम इंडिया गुरुवारी पुण्यात बांगलादेशविरूद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा खेळाडू किंग कोहलीला त्याच्या नावे एक नवा विक्रम करण्याची संधी मिळणार आहे.
विराट कोहली बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात फलंदाज ब्रायन लाराच्या उत्कृष्ट विक्रमाला लक्ष्य करणार आहे. विराट वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा मोठा विक्रम मोडणार आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या वर्ल्डकप सामन्यात 40 रन्स केले तर तो एक मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे.
विराट कोहलीने जर 40 रन्स केल्या तर तो वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर पोहोचणार आहे.
या सामन्यात 40 रन्स केल्यानंतर विराट कोहली वनडे वर्ल्डकपमध्ये त्याच्या एकूण 1226 रन्स पूर्ण करणार आहे.
असं केल्यास विराट कोहली वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला मागे टाकून वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर पोहोचणार आहे.
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे.