शाहजहां मुघल साम्राज्याचा पाचवा बादशाह होता. तोच ज्याने जगप्रसिद्ध ताजमहालची निर्मिती केली.
झालं असं की, शाहजहां 1657 मध्ये खूप आजारी पडला होता. त्यामुळे मुघल साम्राज्यात सत्तेचं वादळ उठलं.
शाहजहां आजारी पडल्यानंतर त्याच्या चारही मुलांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. त्यामुळे मुघल दरबारी कट रचू जाऊ लागले.
सत्तेसाठी शाहजहांचा मुलगा औरंगजेब आणि मोठा मुलगा दारा शिकोह यांच्यातील वाद शिगेला पोहोचला.
बादशाह कोण होणार? यासाठी दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. हे युद्ध सामगढचं युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे.
दोन्ही बाजूने झालेल्या युद्धानंतर औरंगजेबने दारा शिकोहचा पराभव केला.
बादशाह झाल्यानंतर औरंगजेबने स्वत:च्या बापाला म्हणजे शाहजहांला 1658 मध्ये कैद केलं.
कैदेत असताना म्हणजे 31 जानेवारी 1666 मध्ये शाहजहांचा मृत्यू झाला.
शाहजहांची शेवटची इच्छा होती की त्याला मृत्यूनंतर ताजमहालच्या समोरच्या महताब बागेत दफन करावं.
मात्र, औरंगजेबने इच्छापूर्ती न करता शाहजहांला ताजमहलमध्येच दफन केलं.