विराट कोहलीच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक भारी कार्स आहेत. पण आज आपण त्या कार्सबद्दल बोलत नाही आहोत.
आज आपण विराटची पहिली कार आणि त्यासंदर्भातील एक वेगळा किस्सा जाणून घेणार आहोत.
टाटा सफारी ही विराट कोहलीची पहिली गाडी होती. नव्वदीच्या दशकात या कारची क्रेझ होती. विराटला एसयूव्ही आजही तितकीच आवडते.
लूक आणि दमदार इंजिनमुळे एसयूव्ही तरुणांच्या खूप पसंतीस पडली. कंपनी आजही मोठ्या प्रमाणात या गाड्यांची विक्री होते.
विराट कोहलीने आपल्याला टाटा एसयूव्ही का आवडते? याचे कारण सांगितले होते.
'टाटा सफारी त्यावेळेला अशी गाडी होती, की समोर जो येईल तो आपोआप बाजूला होईल. टाटा सफारी घेण्यामागे हे मोटीवेशन होते', असे विराट सांगतो.
'माझ्या पैशांनी खरेदी केलेली टाटा सफारी पहिली कार होती. गाडी चांगली चालते, यात स्पेस खूप आहे. पण ही गाडी जेव्हा चालते तेव्हा लोक आपोआप बाजूला होतात', असेही त्याने सांगितले.
कोहलीने एक मजेदार किस्सादेखील सांगितला. 'मी आणि माझा भाऊ विकास पेट्रोल पंपवर गेलो होतो आणि टाटा सफारी डिझेल गाडीत चुकून पेट्रोल भरलं होतं. यानंतर आम्हाला फ्यूअल टॅंक स्वच्छ करावा लागला होता', असे तो सांगतो.
विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये बेंटले फ्लाइंग स्पर, ऑडी, बीएमडब्ल्यू, लेंम्बॉर्गिनीसहित अनेक महागड्या कार्स आहेत.