भारत आणि इंग्लंड यांच्यातील येत्या 25 तारखेपासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी आता वाकयुद्धाला सुरूवात झालीये.
इंग्लंडकडे 'बॅझबॉल' असेल तर आमच्याकडे 'विराटबॉल' आहे. कोहली पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध चमत्कार घडवेल, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला.
विराट कोहली इंग्रजांचा भरपूर समाचार घेईल, असं म्हणत सुनिल गावस्कर यांनी वायफळ बडबड करणाऱ्या इंग्लंडची बोलती बंद केलीये.
इंग्लंड त्याच रणनीतीने खेळेल पण त्यांनी हे विसरू नये की भारतात कोहली आहे जो त्यांची रणनीती बिघडू शकतो, असंही ते म्हणतात.
पहिल्या कसोटी सामन्यात मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. बेसबॉलची खरी कसोटी फिरकीपटूंविरुद्ध होणार आहे, असं भाकित देखील त्यांनी वर्तविलं.
इंग्लंडविरुद्ध एक खणखणीत द्विशतक आणि दोन शतकं झळकावण्यात कोहलीला यश आलं आहे. त्याचबरोबर भारतीय मैदानावर कोहलीची रनमशिन चालते.
कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत एकूण 1991 धावा केल्या आहेत. 9 धावा होताच कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 2000 धावा पूर्ण करेल.