पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर 21 धावांनी विजय मिळवला. डकवर्थ लुईस नियमांनुसार पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं होतं.
पाकिस्तानच्या विजयामुळे आता त्याचं सेमीफायनलचं स्वप्न जिवंत राहिल्याचं पहायला मिळतंय. मात्र, त्यांच्या या विजयामुळे एका संघाने थेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.
वर्ल्ड कपमधील 35 व्या सामन्यानंतर सेमीफायनलमधील दुसरा संघ निश्चित झाला आहे. भारतानंतर आणखी एका संघाने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे.
होय, साऊथ अफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पाकिस्तानच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झालाय.
साऊथ आफ्रिकेचे 7 पैकी 6 विजयासह 12 गुण आहेत. मात्र, 12 गुणांपर्यंत इतर कोणताही संघ पोहोचणार नसल्याने साऊथ अफ्रिकेने स्थान निश्चित केलंय.
भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात कोलकाताच्या मैदानावर सामना खेळवला जाणार आहे. तर साऊथ अफ्रिका आपला शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
दरम्यान, साऊथ अफ्रिकेचा संघ यंदाच्या वर्षी सर्वोत्तम फॉर्ममध्ये असल्याने चोकर्सचा टॅग पुसणार का? असा सवाल विचारला जात आहे.