भारत हा सर्व धर्म संपन्न असलेला देश म्हणून ओळखला जातो. इथे सर्व धर्माचे, जातीचे नागरिक गुण्यागोविंदाना नांदतात
2011 मध्ये भारतात जनगणना झाली. यानुसार हिंन्दू धर्म हा भारतातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म आहे.
2011 च्या जनगणनेनुसार देशातील 28 राज्यात हिन्दू बहुसंख्य आहेत. तर चार राज्य ख्रिश्चन बहुल राज्य आहेत
देशातील दोन राज्य मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. तर एका राज्यात शिक बहुसंख्य आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार भारतातील 79.8% लोक हिंदू धर्मीय आहेत; त्याखालोखाल मुसलमान 14.2% इतके आहेत.
ख्रिश्चन 2.3%, शीख 1.9%, बौद्ध 0.7% आणि जैन 0.4% आहेत. याशिवाय झोराष्ट्रीयन आणि यहूदी तसंच इतर धर्म तसंच प्रथांचे पालन करणाऱ्या नागरिकांचं प्रमाण o.6% आहे.
भारतातील सहा धर्मांना 'राष्ट्रीय अल्पसंख्याक' दर्जा देण्यात आला आहे. यात मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारश धर्माचा समावेश आहे.