केकेआरचा मालक शाहरुख खान काल आयपीएल फायनलनंतर आनंदात दिसला. त्याने केकेआरच्या खेळाडूंचं कौतूक केलं.
शाहरुख आनंदोत्सव साजरा करत असताना सर्वांच्या नजरा सतत त्याच्या घड्याळावर जात होत्या.
शाहरुखने हातावर Richard Mille घड्याळ घातलं होतं. जगभरात लिमिटेड एडिशन असलेलं हे घड्याळ खुप कमी लोकांकडे आहे.
शाहरुख खानकडे देखील Richard Mille घड्याळ आहे. ज्याचं नाव RM 11- 03 असं आहे. याचे फक्त 500 एडिशन आहेत.
शाहरुखच्या हातात असलेलं घड्याळ टॉप एन्ड मटेरियलने तयार करण्यात आलं आहे. त्याची किंमत 3 लाख अमेरिकन डॉलर ते 5 लाख अमेरिकन डॉलर इतकी आहे.
भारतीय रुपयांमध्ये घड्याळाची किंमत 3.5 कोटी ते 5 कोटी इतकी आहे. टाइटेनियम, कॉपर, TPT आणि सोन्याच्या मदतीने हे घड्याळ तयार करण्यात आलंय.
उद्योगपती अनंत अंबानी देखील हेच घड्याळ मनगटी बांधतात. त्यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला या घड्याळाची चर्चा झाली होती.