सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते.
साराला जगातील वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करायला आवडत असल्याने ती बऱ्याचदा नवनवीन गोष्टी ट्राय करत असते.
साराने नुकतेच सर्फिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.
सारा तेंडुलकरने पोस्ट करत बालपणीच्या आठवणी जागवल्या. तिने म्हटले की, 10 वर्षांची असताना माझ्या काकांनी मला सर्फबोर्डवर बसवले होते तेव्हा पासून मला सर्फिंग शिकण्याची खूप इच्छा होती.
सारा म्हणाली की 17 वर्षांनंतर सर्फ़र्स पॅराडाईज गोल्ड कोस्ट येथे सर्फिंग शिकण्याची संधी मिळाली हा अनुभव खूप अविस्मरणीय होता.