कित्येकजण केसांसाठी जास्वंदाच्या फुलाचा वापर करतात. केसांसाठी जास्वंदाचे फूल अत्यंत गुणकारी आहे.
मात्र, जास्वंदाचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक फायदे आहेत. या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
जाणून घ्या, जास्वंदाचे फूल खाण्याचे फायदे काय आहेत.
जास्वंदाच्या फूलाचे सेवन केल्याने लोहाची कमतरता भरुन काढली जाऊ शकते.
चहामध्ये जास्वंदाची पाने टाकून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
अगदी चाळीशीतही तरुण दिसायचे असेल तर जास्वंदाच्या फूलाचे सेवन करा.
जर तुम्ही उच्च रक्तदाबाच्या आजाराने त्रस्त असाल तर जास्वंदाचा चहा पिणे अधिक फायदेशीर ठरु शकते.
जर तुमची इम्यूनिटी कमकुवत असेल तर नक्की जास्वंदाच्या फूलाचे सेवन करायला हवे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.)