आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. पण आयपीएल 2024 चं जेतेपद पटकावल्यानंतर आता संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांना पुढच्या हंगामात कोलकाता संघातून डच्चू दिला जाऊ शकतो.
याचं कारण समोर आलं आहे. य़ा खेळाडूंबद्दल केकेआर मॅनेजमेंटला कोणताही राग नाही. पण IPL 2025 साठी मेगा ऑक्शन होणार आहे.
वास्तविक IPL 2025 साठी मेगा ऑक्शन होणार असून कोलकाताच नाही तर आयपीएलच्या सर्व संघांना केवळ चार मुख्य खेळाडू संघात ठेवता येणार आहे.
चार मुख्य खेळाडूंना रिटेन केल्यानंतर इतर सर्व खेळाडूंना रिलीज केलं जाईल. हे खेळाडू नव्या ऑक्शनमध्ये बोलीसाठी उपलब्ध असतील.
कोलकाता ज्या खेळाडूंना रिलीज करु शकतं यात अनुकूल रॉय, एस भरत, मनीष पांडे, चेतन साकरिया आणि सुयश शर्मा या खेळाडूंचा समावेश आहे.
याशिवाय मॅचविनर खेळाडू मिचेल स्टार्कलाही केकेआर रिटेन करु शकत नाही. कारण पुढच्या आयपीएल हंगाम स्टार्क खेळण्याची शक्यता कमी आहे.