19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात होणार आहे.
कर्णधार रोहितच्या नेतृत्वात दुसरी आयसीसी टूर्नामेंट जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज असून दुबई चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पोहोचली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत 2 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. परंतु एक अशी टीम आहे ज्यांच्या विरुद्ध भारताला एकदाही जिंकता आलेलं नाही.
न्यूझीलंड विरुद्ध भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकदाही विजय मिळवता आलेला नाही. यामागचं कारण हे देखील आहे की भारताने आतापर्यंत 8 वेळा आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध केवळ एकच सामना खेळला आहे.
2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंड सोबत झाला होता. यात न्यूझीलंडने 4 विकेट्सने विजय मिळवून विजेत्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
जवळपास 24 वर्षांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड ह समोरासमोर येणार आहेत. दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ग्रुप स्टेज सामना हा 2 मार्च रोजी खेळवण्यात येईल. या सामन्यात टीम इंडिया कशी परफॉर्म करते यावर सेमी फायनलमधील स्थान निश्चित होईल.