भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला तेलंगणामध्ये पोलीस उपाधिक्षक (DSP) हे पद देण्यात आलंय.
11 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी मोहम्मद सिराजने तेलंगणा पोलीस उपाधिक्षकाचा पदभार स्वीकारला.
DSP म्हणून पदभार स्वीकारल्यावर मोहम्मद सिराजने तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
'सिराज आता आपल्या नवीन भूमिकेतुन अनेकांना प्रेरणा देईल तसेच आपली क्रिकेट कारकीर्द सुरू ठेवेल', असे तेलंगणा पोलिसांनी सांगितले.
मोहम्मद सिराजला पोलिस खात्यात DSP म्हणून चांगला पगार मिळेल. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा पोलिसात डीएसपीला दर महिना 58,850 ते 1,37,050 इतका पगार मिळतो.
डीएसपी झाल्यानंतर मोहम्मद सिराजला मूळ वेतनासह घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि वैद्यकीय भत्ता यासह इतर सुविधाही मिळणार आहेत.
क्रिकेट आणि जाहिरातींव्यतिरिक्त सिराज पोलिसांच्या नोकरीतूनही मोठी कमाई करेल.
मोहम्मद सिराजने भारताकडून 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सिराज भारताकडून वनडे, टेस्ट आणि टी 20 क्रिकेटमध्ये खेळतो.
मोहम्मद सिराजने आतापर्यंत 29 टेस्ट , 44 वनडे आणि 16 टी 20 सामने खेळले आहेत. तो टीम इंडियाच्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या विजेत्या टीमचा भाग होता.