चहा ही भारतातीलच नाही तर जगातील पॉप्युलर ड्रिंक्सपैकी एक आहे. थकवा दूर करण्यासाठी अनेकजण चहाचे सेवन करतात.
अनेकजणांनी सुरुवात ही चहा पिऊन होत असते. चहाप्रेमी तर अनेकदा दिवसातून 5 वेळा किंवा त्याहीपेक्षा जास्त कप चहा पितात.
परंतु जास्त चहा पिणं हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. तेव्हा जास्त चहा प्यायल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात हे जाणून घेऊयात.
चहामध्ये कॅफिन असते. प्रमाणापेक्षा जास्त कॅफिन शरीरात गेले तर झोपेची समस्या निरमा होते, तणाव येतो आणि हृदयाशी संबंधित आजार सुद्धा वाढतो.
जास्त चहा प्यायल्याने पचनाशी निगडित समस्या निर्माण होतात. चहामध्ये असलेले घटक अपचन आणि गॅस्ट्रिक अस्वस्थता वाढवू शकतात. विशेषतः रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने जास्त त्रास होऊ शकतो.
चहामध्ये असलेल्या घटकांमुळे आणि त्याच्या उष्णतेमुळे दात कमकुवत होतात. यामुळे श्वासाची दुर्गंधी देखील येऊ शकते.
चहामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढून वजन लवकर वाढते. म्हणून जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चहा पिणे टाळायला हवे.
अनेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की जास्त चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका देखील वाढतो.
चहा प्रेमींनी दिवसातून केवळ एक तो दोन कप चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)