19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी अनेक संघांना दुखापतीच ग्रहण लागलंय. तेव्हा या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झालेल्या खेळाडूंची नावं जाणून घेऊयात.
जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीच्या कारणामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. त्याच्या ऐवजी हर्षित राणा याला टीम इंडियात संधी देण्यात आलीये.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा देखील चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. दुखापतीच्या कारणामुळे कमिन्सवर ही वेळ आलीये.
हिप इंजरीमुळे त्रस्त असलेला ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलहूड चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडलाय. ३४ वर्षीय खेळाडूच्या नावावर वनडेत १३८ विकेट्स आहेत.
ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑल राउंडर मिचेल मार्श देखील पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही.
साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्टजे हा सुद्धा पाठीच्या दुखापतीने त्रस्त असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकला आहे.
इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथेल हा हॅमस्ट्रिंग इंजरीने त्रस्त आहे. त्यामुळे यंदा तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडलाय. घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला महत्वाच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
पाकिस्तानचा युवा सलामीवीर फलंदाज सैम अयुब हा दुखापतीने त्रस्त आहे. साऊथ आफ्रिके विरुद्ध सामना खेळताना त्याला ही दुखापत झाली होती, मात्र अद्याप तो यातून बरा झाला नाही.
अल्लाह गझनफर हा अफगाणिस्तानचा फिरकीपटू असून दुखापतीच्या कारणामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडावे लागेल.
न्यूझीलंडचा 27 वर्षांचा खेळाडू बेन सीअर्स हा दुखापतीच्या कारणामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडलाय.