केक सॉफ्ट बनवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टीप्स

Feb 23,2025


वाढदिवस असो किंवा घरातील कोणताही समारंभ असो, कोणतंही सेलिब्रेशन करताना केक कापणं ही आता प्रथाच झाली आहे. वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बेकरीमध्ये विकण्यासाठी उपलब्ध असतात.


आजकाल लोक केक बेकरीतून विकत घेण्याऐवजी तो घरीच बनवून त्याचा आस्वाद घेणं पसंत करतात. मात्र, घरी बनवलेला केक बऱ्याचदा कडक होतो.


बेकरीत मिळणाऱ्या केकसारखा सॉफ्ट केक बनवण्यासाठी काही सोप्या टीप्स जाणून घेऊया.

मैदा किंवा इतर पीठ

तुम्ही केक बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मैदा किंवा इतर कोणत्याही पीठात थोडा इनो (ENO) घाला. जेणेकरुन केकचं बॅटर फुलण्यास मदत होईल.


केकचं बॅटर मिक्स करताना ते हल्क्या पद्धतीने फेटा. बॅटर जास्त फेटल्याने ते पातळ होण्याची शक्यता असते.

व्हॅनेला इसेन्स

केकमध्ये खास फ्लेवर येण्यासाठी तसेच केक स्पंजी होण्यासाठी त्यात व्हॅनेला इसेन्सचा वापर करा. यामुळे केक चविष्ट होतो.

दही

केकच्या बॅटरमध्ये तुम्हीचा दहीचादेखील समावेश करु शकता. यामुळे केक चविष्ट होण्यासोबत सॉफ्ट होण्यास मदत होते.

योग्य तापमान

तुम्ही केक ओव्हनमध्ये बेक करत असाल तर त्याला आधी प्रीहीट करणे गरजेचं आहे. केक व्यवस्थित बेक होण्यासाठी त्यासाठी योग्य तापमान असले पाहिजे.

टीनचा आकार

केक बनवण्यासाठी केकचे भांडे म्हणजेच टीनचा आकारसुद्धा योग्य असायला हवा. टीनचा आकार केकच्या बॅटरनुसार निवडावा. बॅटर कमी असेल तर लहान टीन वापरावा आणि बॅटर जास्त असल्यास मोठ्या टीनचा वापर करावा.

VIEW ALL

Read Next Story