बाजारात तुम्ही अनेक वेळा फळे खरेदी करताना ती कागदात गुंडाळून ठेवल्याचं पाहिलं असेल.
पपई आणि आंब्यासारखी अनेक फळे कागदात गुंडाळल्याने ती ताजी राहतात.
काही फळांमध्ये एथिलीन वायू असतो. हा वायू कागदात गुंडाळून नियंत्रित केला जातो.
कागदामध्ये अनेक कच्ची फळे गुंडाळून ठेवली जातात. जेणेकरून ती व्यवस्थित आणि लवकर पिकतात.
त्यासोबतच फळांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे फळे कोरडी होत नाहीत.
कागदांमध्ये गुंडाळून ठेवलेली फळे लवकर खराब होत नाहीत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)