गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाकडे अनेकांचा ओघ वाढू लागला आहे.
दरवर्षी भारतातून हजारो पर्यटक विदेश भ्रमणासाठी जात आहेत.
फिरायला जाण्यासाठी भारताबाहेरील हा देश एक कमालीचे ठिकाण आहे.
या देशाचं नाव आहे 'व्हिएतनाम'; गेल्या वर्षी भारतातून 5 लाखापेक्षा अधिक पर्यटक या देशाच्या सफरीवर गेले होते.
सरकारी मोजणीनुसार व्हिएतनाम देशात फिरायला जाणाऱ्यांची संख्या 2.6 पटीने वाढली आहे.
समृद्ध संस्कृती, आध्यात्मिकता, चविष्ट खाद्यपदार्थ आणि बजेट फ्रेंडली असल्यामुळे भारतीयांमध्ये व्हियतनाम एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.
'हनोई' शहर व्हियतनामची राजधानी असून तेथील दुसरं मोठं शहर आहे. हे शहर वास्तुकलेसाठी आणि खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.
या देशातील हालोंग खाडी ही पाहण्यासाठी एक आकर्षक स्थळ आहे. हालोंगची विशेष बाब म्हणजे ही हिरव्या पाण्याची खाडी आहे.
हालोंग खाडीतील हिरव्या पाण्याभोवती विविध ऐतिहासिक गुहा आणि चुनखडींचे द्वीप आहेत.
व्हियतनाममधील सुंदर थीम पार्क, नद्या आणि सरोवरेसुद्धा पर्यटकांचे लक्ष वेधतात.