मेकअपमधील सर्वात महत्वाचा भाग आहे लिपस्टिक आहे. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्णच होत नाही.
पण तुम्हाला या लिपस्टिकचा इतिहास माहितीये का? जगातील पहिली लिपस्टिक कुठे बनवली गेली? आणि तिचा वापर कोणी केला होता? जाणून घेऊयात.
लिपस्टिकचा इतिहास हा जवळपास 5 हजार वर्ष जुना आहे. इतिहासकारांचं म्हणणं आहे की फळ आणि फुलांपासून रंग बनवून सुमेरियन सभ्यतेचे लोक याचा आपल्या ओठांवर वापर करायचे.
लिपस्टिकचा उल्लेख हा मेसोपोटामिया सभ्येमध्ये सुद्धा आढळतो. असं म्हटले जाते की या समाजातील महिला सौंदर्याला अधिक महत्व द्यायच्या आणि बहुमूल्य रत्नांच्या डस्टने लिपिस्टिक बनवायच्या, जे ओठांवर लावले जायचे.
लिपस्टिकला बाजारात आणण्याचे श्रेय हे फ्रांसीसी परफ्यूम बनवणारी कंपनी गुलेरियनला जाते.
गुलेरियन कंपनीने पहिल्यांदा 1884 मध्ये लिपिस्टिकला कमर्शियली विकायला सुरुवात केली.
डार्क रंगाच्या लिपस्टिकला लोकप्रिय करण्याचे श्रेय मर्लिन मुनरो आणि एलिजाबेथ टेलर यांना जाते, ती केवळ लाल रंगाच्या डार्क लिपस्टिकचाच वापर करायची ज्यामुळे हा रंग अतिशय प्रसिद्ध झाला.