प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला चांगल शिक्षण द्यायचं असतं. अशावेळी त्यांच्या समोर CBSE आणि ICSE इतर अनेक पर्याय असतात.
CBSE आणि ICSE या दोन बोर्डमध्ये पालकांचं अनेकदा गोंधळ होतो. त्यामुळे यातील फरक जाणून घेऊया.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एक्ज्युकेशन
इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एक्ज्युकेशन
CBSE हे NCERT अभ्यासक्रमावर अवलंबून असतो तर ICSE हे स्वतंत्र असा अभ्यासक्रम आहे. दोघांनाही मान्यता आहे.
CBSE हे मुलांना भारतीय स्पर्धा परीक्षेंची तयारी करुन घेते. जसे की, NEET, IJGE परीक्षांकरिता अभ्यास करुन घेतला जातो. तसेच विज्ञान आणि गणित हे विषय महत्त्वाचे असतात.
ICSE यामध्ये जी मुले परदेशी शिक्षणाचा विचार करत आहेत. त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तसेच यामध्ये भाषेला अधिक महत्त्व असतं.
ज्या पालकांची नोकरी ही ट्रान्सफर होणारी असेल तर त्यांच्या मुलांसाठी CBSE हा उत्तम पर्याय आहे.
ISCE मध्ये इंग्रजी शिकवण्याची पद्धत ही चांगली असते तर CBSE मध्ये बेसिक इंग्रजी शिकवले जाते.
CBSE हे अतिशय कॉम्पॅक्ट स्वरुपात असते ज्यामुळे स्कोअरिंग अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो. तसेच ICSE हे थोडे कठिण आणि थिअरीवर आधारित अभ्यासक्रम असते.