कारमध्ये एसी चालू केल्यावर मायलेजवर परिणाम होतो. कारण एसीचा कंप्रेझर बेल्टच्या माध्यमातून इंजिनशी जोडलेले असतात.
त्यामुळेच तुम्ही एसी ऑन करता तेव्हा इंजिन कारमधील कंप्रेसर सुरु करते. यामुळे इंजिनवर दबाव पडतो ज्यामुळे फ्यूलचे कंझम्पशन अधिक होते.
पण अनेक लोकांना हे माहिती नसेल की, एसी फॅनचा स्पीड जास्त किंवा कमी केल्यास मायलेजवर परिणाम होतो का?
मात्र अनेक लोकांमध्ये याबाबत गोंधळ आहे. मात्र आता तुमचा गोंधळ लवकरच दूर होईल. याबाबत जाणून घेऊया.
तुम्ही एसी फॅन(ब्लोअर)चा स्पीड 1,2,3 आणि 4 किती वरही ठेवा. याचा मायलेजवर काहीच फरक पडत नाही. हे सुरु करण्यासाठी फक्त बॅटरीचा वापर केला जातो.
जर कारमध्ये जास्त लोकं असतील आणि गरम जास्त होत असेल तर तर एसी 4वर देखील ठेवू शकतो. सामान्यपणे एसी 2 वर ठेवल्यास तो पुरेसा होतो.
मायलेजवर तेव्हाच फरक पडतो जेव्हा एसी कंप्रेझर ऑन केला जातो. तसेच एसीचा टेम्प्रेचर काय सेट केला आहे ते देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
जर एसी टेम्प्रेचर जर सगळ्यात खालच्या स्तरावर ठेवले तर एसी कंप्रेझरला जास्त कुलिंग करण्यासाठी सर्वाधिक पावर लागेल. यामुळे इंजिनमध्ये जास्त फ्यूल लागते.