श्रद्धांजली आणि आदरांजली हे दोन्ही शब्द मृत्यू पावलेल्या व्यक्तींसाठी वापरले जातात.
असे असले तरी दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. तो माहिती नसल्यास तुमची अडचण होऊ शकते.
श्रद्धांजली ही एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता, आदर किंवा कौतुक व्यक्त करताना देतात.
तर आदरांजली ही एखाद्या व्यक्तीला आदराने संबोधण्यासाठी केली जाते.
एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता, आदर किंवा कौतुक व्यक्त करण्यासाठी दिलेली कृती म्हणजे श्रद्धांजली.
पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रार्थना केली जाते.
एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नांचा, कामगिरीचा आणि जीवनाचा सन्मान करण्याची वार्षिक परंपरा निर्माण करण्यास मदत होते.
आदरांजली हा शब्द एखाद्या व्यक्तीला आदराने संबोधण्यासाठी केला जातो. तो ज्ञात गोष्टींसाठी असतो.
मृत व्यक्तीच्या जयंती आणि पुण्यतिथीवेळी आदरांजली शब्द वापरतो.
निधनानंतर किंवा पुण्यतिथीवेळी श्रद्धांजली अर्पण केली जाते.