बोर्डाच्या परीक्षेसाठी 'अशी' करा तयारी; काय आहे टॉपर्सची पद्धत?

Feb 20,2025

स्टडी प्लॅन

टॉपर्सच्या मते, परीक्षेआधी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम समजून घेणे जास्त गरजेचे आहे. यासाठी त्याला अनुसरुन योग्य स्टडी प्लॅन बनवणे आवश्यक आहे. यामुळे कठीण विषयांकडे अधिक लक्ष देता येते.

टॉपर्सची पहिली पसंत

NCERT ची पुस्तकं ही टॉपर्सची पहिली पसंत असतात. कारण बोर्डात सर्वाधिक प्रश्न या पुस्तकातून येत असतात. त्यामुळे एकापेक्षा अधिक वेळा ही पुस्तकं वाचल्याने अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या समजता येतो.

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

परीक्षेची पूर्वतयारी करताना मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तसेच, नमुना प्रश्नपत्रिका सोडवणे हे अधिक गरजेचे असते. यामुळे प्रश्नांचे स्वरुप समजते आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव होतो.

नोट्स

प्रत्येक विषयाला अनुसरुन नोट्स बनवल्यामुळे प्रत्येक मुद्द्याकडे लक्ष देता येते. नोट्समध्ये प्रमुख मुद्दे, सुत्रे आणि आकृत्यांचा समावेश करायला हवा. यामुळे परीक्षेच्या आधी उजळणी करणे सोयीचे ठरते.

निश्चित दिनचर्या

टॉपर्सची निश्चित दिनचर्या असते. ते संपूर्ण दिवस किंवा अधिक काळ अभ्यास करत नाहीत तर योजलेल्या वेळेत ते ठरवलेल्या विषयाचा अभ्यास करतात. अभ्यासासोबत ते चांगला आहात आणि पुरेशी झोप घेतात.

लिहण्याचा सराव

नेहमी लिहण्याचा सराव करावा, असे टॉपर्सचे मत. ते वेळ लावून मॉक टेस्ट देतात. यामुळे त्यांच्या लिहण्याच्या वेगात आणि उत्तराच्या सादरीकरणात सुधारणा होण्यास मदत होते.

अभ्यासक्रमातील शंका

टॉपर्स अभ्यासक्रमातील शंकांना जागा ठेवत नाहीत. एखाद्या विषयात काही शंका असेल, तर शिक्षकांना किंवा मित्रांना विचारुन ती शंका ते दूर करतात.

टॉपर्सचे रहस्य

वारंवार उजळणी करणे हे टॉपर्सचे रहस्य आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने हे फॉलो करायला हवे.

VIEW ALL

Read Next Story