घरात तयार केलेलं हर्बल तेल केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
पण कित्येकांना हर्बल तेल तयार करण्याची योग्य पद्धत माहितीच नसते. आज जाणून घ्या कसे तयार करावे हर्बल तेल?
200 ml नारळाचे तेल, 50 ml कॅस्टर तेल, 50 ml ऑलिव्ह ऑयल, अर्धा चमचा लॅवेंडर अॅसेंशिअल तेल, एक वाटी कडुलिंबाची पाने
50 ग्रॅम मेथीचे दाणे, एक वाटी कढीपत्ते, दोन मोठे चमचे आवळ्याची पावडर, 5 ते 6 जास्वंदीची फूलं, भृंगराजची पावडर
साहित्यामध्ये घेतलेले सगळे तेल योग्य प्रमाणात एका वाटीमध्ये घ्या आणि नीट मिक्स करा.
या तेलात थोडे बारीक केलेले मेथीचे दाणे घाला. याच पद्धतीने कढीपत्तेदेखील क्रश करून घाला.
आता या मिश्रणात सगळे पावडर आणि चिरलेली जास्वंदाची फुले घाला.
तयार केलेले मिश्रण 15 ते 20 मिनिटे उकळा आणि त्यानंतर हे तेल थंड झाल्यावर हावाबंद बाटलीत भरा आणि नियमित वापर करा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)