जेवण करताना पाणी पिणे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण अनेक जण विचारतात की जेवताना पाणी प्यावे की नाही?
जर तुम्ही कच्च्या गोष्टी खात असाल तर पाणी पिऊ नये. त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
कलिंगडात भरपूर पाणी असते. त्यामुळे यासोबत पाणी प्यायल्याने पोटातील पाण्याचे प्रमाण वाढल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.
हिरव्या पालेभाज्या खाताना तुम्ही पाणी प्यायल्याने तुमचे पोट भरू शकते. त्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.
कलिंगडाप्रमाणे काकडीमध्ये देखील पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे काकडी खाताना पाणी पिऊ नये.
त्यासोबतच दही खाताना पाणी प्यायल्याने दह्यामध्ये असलेले फायदे कमी होतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)