रिक्षा चालक भजन सिंगला गुरुवारी मध्यरात्री सतगुरु दर्शन बिल्डिंगजवळ एक महिला आणि काही लोकांनी थांबवलं होतं.
त्यानंतर त्या रिक्षा चालकानं सैफ अली खानला रुग्णालयात पोहोचवलं. त्यारात्री त्यानं पैशांचा विचार केला नाही आणि भाडं घेतलं नाही. तर सात ते आठ मिनिटांमध्ये सैफला त्यानं रुग्णालयात पोहोचवलं.
करीना कपूर किंवा सैफच्या कुटुंबातून कोणत्याही व्यक्तीनं अजून त्या रिक्षा चालकाशी संपर्क साधला नसल्याचं त्यानं सांगितलं.
भजन सिंगनं सांगितलं की त्याच्या रिक्षात रक्तबंबाळ अवस्थेत बसलेला अभिनेता सैफ अली खान आहे.
त्या व्यक्तीनं पांढरा कुर्ता परिधान केला होता, तो ऑटोमध्ये चढला मी त्याच्या मानेवर आणि पाठीवर वार केल्याचे पाहिले. पण त्याच्या हातावर कोणतंही निशाण नव्हतं.
रुग्णालयाच्या गेटवर पोहोचल्यानंतर त्यानं गार्डला स्ट्रेचर आणायला सांगत तो सैफ अली खान असल्याचं सांगितलं.