सनातन धर्मात आंघोळीला पावित्र्य आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले गेले आहे. हे करणे केवळ अध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक नाही तर ते आरोग्य आणि मानसिक शांती देखील वाढवते.
शास्त्रामध्ये स्नानासंबंधी गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये स्नानाचे प्रकार, नियम आणि त्यासंबंधीच्या पद्धती सांगितल्या आहेत.
शास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते आणि सूर्यास्तानंतर स्नान करणे अशुद्ध मानले जाते.
रात्रीच्या वेळी आंघोळ करणे अशुद्ध मानले जाते आणि केवळ विशिष्ट आरोग्य कारणांमुळे किंवा धार्मिक विधींसाठीच केले जाऊ शकते.
आज जाणून घेऊयात आंघोळ करताना शरीराच्या कोणत्या भागावर आधी पाणी टाकावे?
प्रेमानंद महाराजांच्या म्हणण्यानुसार, स्नान करण्यासाठी प्रथम नाभीवर पाणी टाकावे, असा शास्त्रात उल्लेख आहे. यानंतर खांद्यावर, छातीवर आणि संपूर्ण शरीरावर पाणी घालावे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)